कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर येथे मुख्य मार्केट असून येथे स्वमालकीची 3.12 हे.आर जागा आहे शेतक-यांचा शेतमाल निघाल्यानंतरच्या सिझनमध्ये शेतकरी आपला शेतमाल येथे विक्रीस आनतात. व या मार्केटवर शेतक-यांच्या शेतमालाची विक्री बोली पद्धतीने होत असते तसेच येथे शासकिय खरेदी तूर,चना,व सोयाबिन नाफेड व एफ.सि. आय. अंतर्गत चंद्रपूर जिल्हा कृषि औद्योगीक सहकारी संघ शाखा चिमूर व्दारे खरेदी केल्या जाते. त्यांना बाजार समिती वजन काटे,ताडपत्र्या,पिण्याचे पाणि,प्लॅटफार्म,साठवणुकीकरीता गोदाम तसेच इतर आवश्य़क सुविधा पुरवित असते किंवा उपलब्ध करुन देत असते.