कृषी उत्पन्न बाजार समिती,चिमूर जि.चंद्रपूर ची स्थापना सन 1982 ला वरोरा बाजार समितीमधुन विभाजन होवून झालेली आहे. समितीचे कार्यक्षेत्र चिमूर तालुक्यापुरते मर्यादित असून तालुक्यातील 259 गावे समाविष्ट़ आहे. मा.स्वर्गीय गुलाबराव रामचंद्रजी डोंगरे साहेब यांनी संस्थेची स्थापना केली असून प्रथम सभापती सुद्धा तेच होते. समितीच्या कामकाजाला सुरवात प्रत्यक्षात 09/11/1982 ला झाली. समिती सध्या “ब” वर्गात असून मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांनी मंजूरी दिली आहे. समितीचे मुख्य बाजार आवार चिमूर येथे असून बाजार आवाराकरीता 3.12 हे.आर जागेस मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांनी मंजूरी दिली आहे. तसेच उपबाजार नेरी येथे 1.16 हे.आर तसेच उपबाजार आवार भिसी येथे 1.21 हे.आर व कापूस संकलन केंद्र खडसंगी करीता 1.91 हे आर जमीन खरेदी केलेली आहे. सदर जमिन खरेदीस मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांनी मंजूरी दिलेली आहे.
समिती सध्या “ब” वर्गात असून पॅटर्न प्रमाणे एकूण मंजूर पद 11 आहे. त्यापैकी सध्या 9 कायम कर्मचारी कार्यरत आहेत. बाजार समिती शेतकरी हिताकरीता काम करीत आहे. तसेच शेतक-यांच्या शेतमालाला योग्य़ भाव मिळवून देण्याचे कार्य बाजार समिती करीत आहे. शेतक-यांकरीता बाजार समिती दरवर्षी शेतमाल तारण योजना राबविते .मार्केट यार्डवर विक्रीकरीता आलेल्या शेतमालाची स्पर्धात्म़क बोली काढून जास्तीत जास्त़ भाव शेतक-यांच्या शेतमालाला मिळवून दिल्या जाते. समितीचे उत्पन्ऩ वाढविण्याचे दृष्टिने कर्मचारी व पदाधिकारी नेहमी कार्य करीत आहेत.
कृषि उत्पन्ऩ बाजार समिती,चिमूर मध्ये संचालक मंडळ अस्तीत्वात असून त्यांचा कार्यकाल 12/05/2023 ते 11/05/2028 पर्यंत आहे. संचालक मंडळामध्ये एकूण 18 सदस्य़ आहेत. श्री मंगेशजी ल. धाडसे सभापती व श्री रविंद्रजी सो. पंधरे उपसभापती आहेत.
या बाजार समितीचे नेरी ,भिसी, कोलारी हे उपबाजार आहेत.कृषि उत्प़न्ऩ बाजार समिती अंतर्गत चार अनुज्ञप्तीधारक जिनिंग फॅक्ट्री असून भिसी उपबाजार अंतर्गत दोन खाजगी जिनिंग आहेत व रेंगाबोडी आणि चिमूर येथे प्रत्येकी एक जिनिंग आहे त्यामध्ये बाजार समितीअंतर्गत शेतक-यांचा शेतमाल कापूस मोठया प्रमाणात खरेदी केला जातो.तसेच शासनाचे अंतर्गत CCI चे मार्फतीने कापसाची शासकिय खरेदी सुद्धा मोठया प्रमाणात तालुक्यातील या चारही जिनिंगवर होत असते. तसेच नेरी उपबाजार अंतर्गत धानाची शासकिय खरेदी सुदधा सहकारी संस्थाच्या मार्फतीने केली जाते व त्यांना बाजार समिती सर्व सोयी-सुविधा पुरवित असते.